नेहमी विचारले जाणारे प्रश्न
HDFC Bank Insta Account Journey काय आहे ?
- HDFC Bank ची Insta Account Journey बचत खाते उघडण्यासाठी संपूर्णपणे digital आणि संपर्करहित प्रक्रिया आहे. मग ते आमच्याकडील नियमित बचत खाते असो किंवा premium SavingsMax account असो, तुम्हाला ते सहजपणे घरबसल्या त्वरित सुरू करता येईल. तुम्हाला तुमचा खाते क्रमांक आणि Customer ID देखील त्वरित मिळू शकेल.
- Insta Account Journey दरम्यान खात्याची आवश्यक शिल्लक रक्कम तुमच्या निवडलेल्या खाते प्रकारानुसार लागू असेल.
- तुमचे खाते Net आणि MobileBanking प्रणालीशी आगोदरच जोडले गेलेले असेल, म्हणजेच तुमच्या खात्यात पैसे आल्यानंतर तुम्ही HDFC Bank बचत खात्यातून बँकेचे व्यवहार सुरू करू शकता.
- InstaAccount Journey माध्यमातून उघडण्यात आलेली खाती ही मर्यादित KYC/ खातेदारांची ओळख प्रक्रियेतून सुरू करण्यात आलेली असल्यामुळे ती केवळ एक वर्षासाठी वैध राहतील. आपले खाते digitally उघडल्यानंतर ते आपल्या पसंतीच्या नियमित बचत खात्यात रूपांतरित करण्यासाठी या दरम्यानच्या कालावधीमध्ये, तुम्ही KYC / आमच्या कोणत्याही शाखेत भेट देऊन खातेदारांची ओळख प्रक्रिया पार पाडू शकता किंवा video KYC सेवेचा लाभ घेऊ शकता.
HDFC Bank InstaAccounts चे मुख्य फायदे काय आहेत ?
- तुम्ही स्वतः 2 मिनिटात हे खाते उघडू शकता.
- तुम्हाला तुमचा खाते क्रमांक आणि cudtomer ID त्वरित मिळू शकेल.
- तुमचे खाते Net आणि MobileBanking प्रणालीशी आगोदरच जोडले गेलेले असेल त्यामुळे जसे तुमच्या खात्यात पैसे येतील, तसे तुम्ही बँकेचे व्यवहार सुरू करू शकता.
- InstaAccount च्या सहाय्याने तुम्ही बिले भरणे, पैसे पाठविणे आणि मागविणे, HDFC Bank ATMs मधून पैसे काढणे इत्यादी बँकेचे सगळे व्यवहार करू शकता.
- InstaAccount च्या सहाय्याने तुम्ही मुदत ठेव योजना देखील सुरू करू शकता.
HDFC Bank InstaAccount मला कसे सुरू करता येईल ?
तुम्ही केवळ एका click here या सोप्या पद्धतीने किंवा Playstore मधून HDFC Bank Instant Account app download करू शकता.
जोपर्यंत तुमच्याकडे तुमचा सध्याचा कार्यरत mobile number आणि Aadhaar आहे, तोपर्यंत हे खाते उघडणे अतिशय सोपे आणि जलद आहे.
केवळ आवश्यक तपशील पूर्ण करा आणि आपला आधार वापरून तपशील प्रमाणित करा.
मी याचा वापर कसा करू शकतो ?
NetBanking साठी तुम्ही पूर्वनोंदणीकृत आहात. तुम्हाला फक्त तुमचा password नोंदवायचा आहे. तुमचे खाते क्रमांक तयार झाल्यानंतर तुमच्या email वर link दिली जाईल, ज्याद्वारे IPIN आधारे split OTP दिला जाईल. (OTP चा एक भाग email द्वारे आणि OTP चा दुसरा भाग तुमच्या mobile वर पाठविला जाईल.) एकदा तुम्ही खाते उघडले आणि NetBanking चा password नोंदविला की, तुमच्या या खात्यात तुम्ही कोठूनही पैसे transfer करू शकता. तुम्हाला खाते क्रमांक मिऴताच तुमचा पगार देखील HDFC Bank InstaACCOUNT मध्ये जमा होऊ शकेल. एकदा खाते उघडण्याच्या प्रक्रियेत तुमचा NetBanking चा password नोंदविला गेला की, या खात्यातून तुम्ही तुमचे सर्व व्यवहार करू शकता.
पात्रता
HDFC Bank InstaAccount कोण सुरू करू शकतो ?
१८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेली निवासी भारतीय व्यक्ती, जिचे विद्यमान HDFC Bank खाते नाही.
अनिवासी भारतीय, HUF, HDFC Bank मध्ये सध्या खातेदार असलेले HDFC Bank InstaAccount उघडू शकतात का ?
नाही. अनिवासी भारतीय, HUF, HDFC Bank मध्ये सध्या खातेदार असलेले HDFC Bank InstaAccount उघडू शकत नाहीत.
मी HDFC Bank InstaAccount च्या माध्यमातून joint account उघडू शकतो का ?
नाही. हे खाते केवळ एका व्यक्तीकडेच असू शकते.
Trouble-shooting / अर्ज करण्याच्या प्रक्रियेसंबंधी
अर्ज करण्याच्या प्रक्रियेत शाखेची विचारणा करण्यात आली आहे, मी कशाची निवड करावी ?
तुमच्या जवळ असलेल्या HDFC Bank च्या शाखेची निवड करा.
HDFC Bank InstaAccount अर्ज करण्याच्या प्रक्रियेच्या पद्धतीमध्ये मी Corporate नावाची निवड कशी करावी ?
तुमच्या कंपनीच्या नावाची पहिली तीन अक्षरे लिहा आणि येणाऱ्या यादीमधून निवड करा.
आधारचा OTP मला का मिळू शकत नाहिये ?
OTP ची अधिकृतता मिळविण्यासाठी / प्रमाणित करण्यासाठी तुमचा सध्याचा चालू mobile क्रमांक UIDAI / आधार संकेतस्थळाशी नोंदविलेला असयला हवा.
तुम्ही उत्तम network च्या परिसरात आहात, हे देखील तुम्ही सुनिश्चित करणे गरजेचे आहे.
मी वापरत असलेला mobile क्रमांक आधार बरोबर जोडलेला नसेल तरी काय मी खाते उघडू शकतो का ?
होय. तुम्ही वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र किंवा मतदार ओळखपत्र या सारखे ओळखपत्राचे अन्य पर्याय वापरू शकता. तथापि, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खाते क्रमांक त्वरित प्राप्त होणार नाही. खाते क्रमांक तुम्हाला देण्यापूर्वी HDFC Bank शाखेमधील कर्मचारी तुमच्याशी संपर्क करतील.
माझा पत्रव्यवहाराचा आणि कायमचा पत्ता हा वेगळा असू शकतो का ?
होय. तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायम निवासाचा पत्ता हे वेगळे असू शकतात.
आधारच्या OTP पडताळणीसाठी माझा पत्रव्यवहाराचा पत्ता देणे बंधनकारक आहे का ?
नाही. आधारच्या पडताळणीसाठी पत्रव्यवहाराचा पत्ता देणे बंधनकारक नाही.
UIDAI / आधार मधून मिळविलेला तपशील मी बदलू शकतो का ?
UIDAI मधून मिळविलेला तपशील जसे की नाव आणि पत्ता यामध्येबदल करता येणार नाही. या तपशीलाचा वापर करून तुमचे खाते उघडले जाईल.
आधारचा वापर न करता आणि अन्य KYC कागदपत्रांच्या आधारे मला खाते उघडता येईल का ?
होय. आधार कार्डाची प्रत, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र आणि पारपत्र यांच्या आधारे खाते उघडता येईल. या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा खाते क्रमांक त्वरित प्राप्त होणार नाही. खाते क्रमांक तुम्हाला देण्यापूर्वी HDFC Bank शाखेमधील कर्मचारी तुमच्याशी संपर्क करतील.
PAN च्या खेरीज खाते उघडता येईल का ?
तुमचे वार्षिक उत्पन्न जर २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला PAN / PAN च्या पोचपावतीची आवश्यकता आहे.
InstaAccount सुरू करण्यासाठी आधार कार्डाची प्रत / क्रमांक देणे बंधनकारक आहे आहे ?
नाही. आधारचा वापर करणे बंधनकारक नाही. तथापि, तुमच्या तपशीलाची पडताळणी त्वरित होते, तुमचा खाते क्रमांक आधारच्या माध्यमातून जलद मिळविता येतो. ही प्रक्रिया अधिक जलद गतीने आणि सोप्या पद्धतीने होते. पारपत्र, वाहन चालविण्याचा परवाना किंवा मतदार ओळखपत्र या KYC तपशीलांचा वापर केल्यास प्रक्रिया संथगतीने होते कारण तुम्हाला तुमचा खाते क्रमांक मिळण्यापूर्वी HDFC Bank तुमच्याशी संपर्क साधणार असते.
PAN card ची प्रत upload करणे बंधनकारक आहे का ?
नाही. तुम्ही PAN card ची प्रत upload करण्याची गरज नाही. केवळ PAN क्रमांकाचा उल्लेख करा.
माझे खाते सुरू झाले असल्यास मी पाठपुरावा कसा करू शकतो ?
जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक वापरला असेल, तर तुम्हाला त्वरित तुमचा खाते क्रमांक मिळाला असेल. जर तुम्ही अन्य ओळखपत्रांच्या तपशीलाचा वापर केला असेल तर, तुम्हाला देण्यात आलेला संदर्भ क्रमांक वापरून तुमच्या अर्जाची सद्यस्थिती Track My Application या लिंकवर तुम्ही तपासून घेऊ शकता.
मला माझा खाते क्रमांक कधी मिळू शकेल ?
Online पद्धतीने जसे UIADI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडून तुमच्या आधार क्रमांकाचा तपशील प्रमाणित होईल, तसे तुम्हाला तुमचा खाते क्रमांक आणि Customer ID प्राप्त होईल.
जर तुम्ही ओळखपत्रांच्या अन्य पर्यायांचा वापर केला असेल, तर त्याला काही अवधि लागेल कारण, तुम्हाला खाते क्रमांक देण्यापूर्वी आमच्या शाखेच्या गटाला तुमच्याशी संपर्क साधावा लागेल.
जर मी अन्य KYC कागदपत्रांचा वापर केला असेल तर मला खाते क्रमांक त्वरित मिळू शकतो का ?
तुम्ही आधार खेरीज जर अन्य ओळखपत्रांचा वापर करीत असाल तर तुमचा खाते क्रमांक त्वरित तयार होऊ शकणार नाही. आमच्या शाखेच्या गटाकडून अधिकृतता / प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिला जाईल. तुम्हाला दिलेला संदर्भ क्रमांक वापरून तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्ही Track My Application या लिंकवर तपासू शकता.
जर अर्जामधील Link कडून प्रतिसाद मिळाला नाही / वेग कमी असेल तर काय करावे ?
खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चांगल्या network वहनाची आवश्यकता आहे.
माझ्या खात्याला लागू असलेल्या मर्यादा सांभाळणे, हे मी कसे सुनिश्चित करू शकतो ?
तुम्ही पुढील गोष्टी करीत आहात हे सुनिश्चित करू शकता :
१. कोणत्याही वेळेस तुमच्या खात्यातील रक्कम १ लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये.
२. आर्थिक वर्षात तुमच्या खात्यावरील जमा ही २ लाख रुपयांपुढे जाणार नाही. तुमचे खाते हे १ वर्षासाठी वैध आहे, हे लक्षात असू द्या.
तुम्ही तुमच्या HDFC Bank शाखेबरोबर देखील संपर्कात राहू शकता आणि तुमच्या पसंतीच्या बचत खात्यामध्ये याला रुपांतरित करण्यासाठी पूर्ण KYC ची पूर्तता करू शकता. वरील बंधने याला लागू पडणार नाहीत आणि HDFC Bank मधील नियमित बचत खात्यांच्या सर्व लाभांचा तुम्ही आनंद घेऊ शकाल.
या खात्याला मी एका प्रमाणित बचत खात्यामध्ये standard savings account रुपांतरित करू शकतो का ?
होय, एक वर्षाच्या कालावधीत तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या आमच्या शाखेशी कधीही संपर्क करू शकता आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण KYC ची परिपूर्तता करण्यासाठी मदत करू आणि हे खाते नियमित बचत खात्यामध्ये रुपांतरित करू.
मी खात्यावर Netbanking चा लाभ कसा घेऊ शकतो ?
तुमचे खाते Netbanking वापरासाठी सक्षम असेल, तुम्हाला केवळ ते सुरू करायचे आहे. हे कशा प्रकारे करायचे याची माहिती देणारा एक SMS, e-mail तुम्हाला मिळेल.
एखादा ग्राहक Netbanking साठी नोंदणी कशी करू शकेल ?
तुम्ही Netbanking साठी आगोदरच नोंदविले गेलेले आहात. तुम्हाला केवळ तुमचा password तयार करायचा आहे. तुमचा खाते क्रमांक तयार झाल्यानंतर तुम्हाला e-mail च्या माध्यमातून एक link दिली जाईल, ज्याद्वारे IPIN आधारे split OTP दिला जाईल (OTP चा एक भाग e-mail द्वारे आणि OTP चा दुसरा भाग mobile वर पाठविला जाईल.)
जर एक वर्षाच्या कालावधीमध्ये मी माझे HDFC InstaAccount रुपांतरित करू शकलो नाही तर काय होईल ?
तुमचे खाते block करण्यात येईल.
या खात्याच्या माध्यमातून मी कोणत्या प्रकारचे व्यवहार करू शकतो ?
- तुम्ही बिले भरू शकता, recharge करू शकता, आणि पैसे देण्याचे नियोजन करू शकता
- तुम्ही खरेदी करू शकता आणि सुरक्षितपणे online पद्धतीने रक्कम अदा करू शकता
- तुम्ही पैसे हस्तांतरित करू शकता
संपूर्ण KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि माझे खाते रुपांतरित करण्यासाठी मी शाखेत भेट दिली पाहिजे का ?
होय. तुमच्या पसंतीच्या नियमित बचत खात्यामध्ये हे खाते रुपांतरित करण्यासाठी तुम्हाला KYC कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह त्याची पडताळणी करण्यासाठी शाखेला भेट द्यावी लागेल.
हे खाते उघडण्यासाठी काही शुल्क आकारले जाईल का ?
या खात्याशी संबंधित कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
माझे खाते उघडताना मी निवडलेली बचत / Salary account ही वैशिष्ट्ये खाते घडल्यानंतर असतील का ? (उदाहरणार्थ : नियमित बचत खाते / महिलांचे खाते / ज्येष्ठ नागरिकांचे खाते)
नाही, एकदा तुम्ही कोणत्याही HDFC Bank शाखेत KYC ची औपचारिकता पूर्ण केलीत की ही वैशिष्ट्ये केवळ तुमच्या त्या खात्यावर उपलब्ध असतील.
HDFC Bank InstaAccount मी अधिकाधिक किती काळ सुरू ठेवू शकतो ?
तुम्ही अधिकाधिक एक वर्षासाठी HDFC Bank InstaAccount सुरू ठेवू शकता. तुम्ही पूर्ण KYC ची औपचारिकता पूर्ण करू शकता आणि दरम्यानच्या काळात हे खाते नियमित बचत खात्यामध्ये रूपांतरित करू शकता. कृपया यासाठी तुमच्या जवळ्च्या HDFC Bank शाखेला भेट द्या.
अशी कोणती एखादी तारीख आहे का, की त्या तारखेपर्यंत मला पैसे हस्तांतरित करायला हवेत / माझा पगार खात्यात जमा होणे आवश्यक आहे ?
नाही. जसे की, तुम्ही तुमच्या खात्याचा वापर सुरू करण्यासाठी digital पद्धतीने त्वरित पैसे तुमच्या खात्यात हस्तांतरित करू शकता (आदर्श पद्धतीने तीन दिवसांमध्ये).
हे खाते मी digital पद्धतीने उघडताना काय अपेक्षा करू शकतो ?
तुम्हाला तुमच्या HDFC Bank InstaAccount चा खाते क्रमांक आणि Customer ID त्वरित उपलब्ध होतो. खाते उघडण्याच्या प्रक्रियेत आम्ही तुम्हाला Netbanking सुरू करण्याची link देखील पाठवू. खाते उघडताना तुम्हाला third party पैसे हस्तांतरित करावयाचे असल्यास त्या पुष्टीकरणाबद्दलही विचारले जाईल.
मला धनादेश पुस्तिका आणि Debit Card कधी मिळू शकेल ?
HDFC Bank InstaAccount धनादेश पुस्तिका आणि Debit Card देऊ करत नाही. पैसे काढण्याबरोबरच तुमचे सगळे व्यवहार तुम्ही digital पद्धतीने हाताळू शकता.
HDFC Bank InstaAccount मधून मी पैसे कसे काढू शकतो आणि त्यासाठी काही शुल्क आकारले जाईल का ?
HDFC Bank च्या ATM मधून पैसे काढण्यासाठी तुम्ही तुमच्या mobile phone चा वापर करू शकता. केवळ Cardless Cash Withdrawal हा पर्याय निवडा आणि पुढील सूचनांची अंमलबजावणी करा. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज करण्याच्या प्रक्रियेदरम्यान मी disconnect झालो तर, जिथे प्रक्रिया थांबली होती, तेथून पुढे मला प्रक्रिया करता येऊ शकते का ?
होय. ज्या ठिकाणी तुमचे काम थांबले होते, तिथपासून तुम्ही पुन्हा प्रक्रिया सुरू करू शकता.
एका पूर्ण KYC खात्यामध्ये मी माझे खाते करू रूपांतरित करू शकतो ?
तुम्हाला KYC पूर्ण करण्यासाठी शाखेला भेट द्यावी लागेल आणि तुमचे खाते तुमच्या पसंतीच्या नियमित बचत खात्यामध्ये रूपांतरित करता येईल.
माझ्या Insta Account वर मी माझा Email अद्ययावत / बदलू शकतो का ?
नाही. तुमच्या Insta Account वर E-mail ID बदलण्यासाठी तुम्हाला संपूर्ण KYC ची प्रक्रिया कोणत्याही जवळच्या शाखेत nearest branch पूर्ण करावी लागेल.